हिप्नॉटिझम

                हिंदी व भूगोल या विषयाचा सातत्याने १००% निकाल लावणारे अध्यापक श्री. एच. जी. दळवी हे संमोहनतज्ञ असून त्यांनी या कलेचे अनेक स्टेज प्रोग्राम जिल्ह्याबाहेरही सादर केले आहेत. विशेषतः समस्याग्रस्त व अभ्यासाविषयी न्यूनगंड-भीती असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनाच्या एकाग्रतेसाठी या प्रयोगांचा विशेष उपयोग होतो. संमोहनशास्त्राचा सर्वात मोठा उपयोग कमकुवत मनाच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवणे व सुप्तमनात दडपलेल्या मानसिक समस्या शोधून त्यावर उपाय करण्यासाठी होतो.

              निसर्गाकडे चला या न्यायाने आज सर्व जग पुन्हा एकदा भारताच्या प्राचीन आयुर्वेदाकडे कुतुहलाने पाहत दुर्मिळ वनौषधिंची ओळख मुलांना व्हावी यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. प्रशालेने मान्यवर संस्थांच्या सहकार्याने व मुलांच्या श्रमदानातून वनौषधी-उद्यान उभारले असून पश्चिम घाट व अन्य ठिकाणी असणाऱ्या विविध वनौषधींची लागवड केली असून त्यांच्यातील औषधी गुणांचा परिचय मुलांना करुन दिला जातो.

Followers