Monday, January 10, 2011

थोडक्यात शाळेबद्दल

"चिरा चिरा हा घडवावा
अज्ञानी तो पढवावा
कळस कीर्तीचा चढवावा
थेंब तुम्ही तर सागर हे
सत्य शिवाहून सुंदर हे!"
होय!
       कॉम्प्युटर युगाच्या अन् स्पर्धेच्या या युगात आपन आपल्या पाल्ल्यासाठी काय काय कारु शकता?
केवळ एखाद्या प्रशालेतील मुलांच्या गर्दीत त्याला डोनेशन भरुन कोंबला आणि एखाद्या धंदेवाइक कोचिंग क्लासचे ठिगळ त्याच्या व्यक्तीमत्वाला लावता. 'केबल' संस्कृतीपासून त्याला दूर ठेवू शकत नाही. रिमिक्स गीतांच्या कॅन्सरपासून त्याला वाचवू शकत नाही. कारण आता आपण एकत्र कुटुंब पद्धतीत राहत नाही तर ब्लॉक संस्कृतीत राहतो व रोज सकाळी आई-वडील नोकरीला बाहेर पडतात. चिमुकल्या मुलांना शिल्लक      राहतो 'इडियट बॉक्स' त्याचा रिमोट अन् प्रचंड स्वातंत्र्य?
        मुलाच्या प्रगतीचा साप्ताहिक आलेख नाही पाहू शकत तुम्ही मग त्याचा सर्वांगीण विकास तर दुरच... आम्ही त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायचा प्रयत्न करतो आहोत गेली दहा वर्षे.
         या, भेट द्या आणि प्रत्यक्ष खात्री करुण घ्या.
        मानव हे निसर्गाचेच अपत्य. पण या निसर्गाकडे आपण पाठ फिरवली आणि सारे जग प्रदुषणाच्या विळख्यात सापडले. आज निसर्गातील सर्व घटकांबरोबर शिक्षणक्षेत्रही प्रदुषित झालय. इतर प्रदुषणांपेक्षा हा धोका मोठा आहे....यावर उपाय एकच
'निसर्गाकडे चला'

         नोबेल प्राईज मिळवणारे भारताचे थोर शिक्षणतज्ञ आदरणीय रवींद्रनाथ टागोर यांनी याच उद्देशाने शांतीनिकेतन या वेगळ्या धर्तीच्या शिक्षणसंस्थेची स्थापना केली. हेच चित्र डोळ्यापुढे ठेवून आम्ही शहरी संस्कृतीपासून दूर निसर्गाच्या कुशीत आमच्या शिक्षण संकुलाची उभारणी केली आहे. आमच्याकडे केवळ पुस्तकी शिक्षण नाही तर त्याच बरोबर विविध व्यावसायिक कौशल्यांचाही त्यात अंतर्भाव होणार हा आता सर्वसामान्य झालेला सिद्धांत आहे. त्यानुसार आमच्या प्रशालेत पुस्तकी ज्ञानाबरोबरच वेगवेगळे शेतकीविषयक उपक्रमही आम्ही सुरु ठेवलेत. फलोद्यान वनौषधी लागवड व संगोपन त्याचा व्यवसायिक विनियोग याचे प्रशिक्षण घेऊन् आमचा विद्यार्थी स्वावलंबी बनतो.

Followers