लष्करी प्रशिक्षण, नेमबाजी.....

        जीवन म्हणजे संघर्ष पावलोपावली संघर्ष तारीख जाहीर न करता एक परीक्षा सर्वांना अनपेक्षितपणे द्यावी लागते. त्या परीक्षेचे नाव आहे संकट. आपल्या आगमनाची चाहूल लागू न देता ती येते. म्हणून मांजराच्या पिलाप्रमाणे सदोदित तल्लख व सजग रहायला विद्यार्थ्यांनी शिकल पाहिजे. उंच फेकलेलं मांजराचे पिल्लू ज्या प्रमाणे स्वतःला अचूक सावरुन जमिनीवर उभं राहतं त्या प्रमाणे तुमच्या मुलांनाही सक्षम बनवा. शिवचरित्राचे व्याख्याते व वनविद्या अभ्यासक श्री. राजेन्द्र राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रशालेतील हे लष्करी प्रशिक्षण तुमच्या मुलांना सक्षम बनवेल. आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या विद्यार्थीनीही अचूक नेमबाजी व गिर्यारोहण,गिरिभ्रमण करु शकतात.

Followers